राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राहुल गांधी हे गंभीर मुद्द्यांवर तथ्याधारित चर्चा करण्याऐवजी सातत्याने खोटे आरोप करत आहेत. राहुल गांधींना बोलायचे नसून केवळ आरोप करायचे आहेत. आपल्या देशाला, आपल्या लष्कराला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असे आरोप करून ते फक्त चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत असा जाेरदार हल्लाबाेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केला.

पत्रकारांशी बाेलताना फडणवीस म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेशी आणि प्रतिष्ठेशी संबंधित विषयांवर राजकारण करणे योग्य नाही. राहुल गांधींकडून होणारी वक्तव्ये ही जबाबदार नेतृत्वाला साजेशी नसून ती देशहिताला धक्का पोहोचवणारी आहेत.



राज्यातील लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले, या विषयावर विविध स्तरांतून मागण्या येत असल्याचे मान्य करताना, कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. ही योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असून तिच्याशी संबंधित कोणताही बदल हा चर्चेतून आणि सामूहिक निर्णयातूनच केला जाईल.

एकीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या सामाजिक योजनांबाबत सरकार संवेदनशीलतेने निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून केवळ आरोपांचे राजकारण सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Rahul Gandhi just wants to stay in the news with false allegations, says Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या