विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Shetty प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) जुहू येथील शेट्टी टॉवर या निवासस्थानावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी काही तासांतच छडा लावला. मुंबई गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत पुण्याच्या कर्वेनगर आणि धायरी परिसरातून ५ पैकी ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरने स्वीकारली आहे. पाचही आरोपींनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.
रविवारी १ फेब्रुवारी २०२६ मध्यरात्री १२:४५ च्या सुमारास दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी ‘शेट्टी टॉवर’च्या दिशेने पाच राउंड गोळीबार केला. यातील एक गोळी पहिल्या मजल्यावरील जिमच्या काचेला लागली. घटनेनंतर काही वेळातच शुभम लोणकर याने सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, हा केवळ ट्रेलर आहे, आमच्या कामात हस्तक्षेप करू नका, अशी धमकी दिली. Rohit Shetty
मुंबई गुन्हे शाखेच्या १२ पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचे पुणे कनेक्शन शोधले. कारवाईत पुण्याच्या कर्वेनगर येथील मावळे आळीत राहणारा अमन आनंद मारोते आणि गल्ली क्र. २ मधील आदित्य ज्ञानेश्वर गायकवाड याला, तसेच, धायरी परिसरात आम्रपाली बिल्डिंगमध्ये राहणारा सिद्धार्थ दीपक येनपुरे आणि रायकर मळा येथील समर्थ शिवशरण पोमाजी यालाही अटक केली आहे. यासह पुणे शहरातून स्वप्निल बंडू सकट यालाही ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत या तरुणांनी गोळीबाराच्या कटात प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली दिली.
Firing at Rohit Shetty’s Home: Five Pune Accused Confess to Involvement
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास