विशेष प्रतिनिधी
नागपूर : 20 जुलै रोजी होणारा मोर्चा निघाला पाहिजे. जनतेच्या आणि युवकांच्या प्राणाची यांना चिंता नाही. आपलं म्हणणं खरं करणं याला हुकूमशाही म्हणतात, तेच हे सरकार करत आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. Uddhav Thackeray
अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील चोरीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात शिवसेना ठाकरे पक्षानं रामरक्षा पठण आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनासाठी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर दाखल होताच उद्धव ठाकरेंन माध्यमांशी संवाद साधाल.
उद्धव ठाकरे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दूरपर्यंत संबंध नाही. ज्या पद्धतीनं निर्दयी आणि क्रूरपणे युवकांच्या भवितव्याशी खेळलं जात आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे. जर सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची सरकारला एवढीच काळजी असेल, तर यापूर्वीच त्यांच्याशी बोलण्याची अवशक्यता होती. कळत नाही की नीटची परीक्षा सरकार व्यवस्थित घेऊ शकत नाही. त्यामुळे भाजप आणि प्रशासनाचा त्यांच्याशी संबंध नाही. आंदोलन नीट हाताळू शकत नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्यात असं काय आहे, महत्त्वाचं म्हणजे आणखी किती बळी घेतल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाणार आहे. कारण सोनम वांगचूक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता उपोषण पुकारलं आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जंतरमंतरवर असलेली मुलं उपोषणाला बसली आहेत. या पूर्वीच नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सातत्यानं अशाप्रकारे आत्महत्या होऊन युवाशक्ती वाया जात असताना धर्मेद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं आहे. ज्यांना सरकार पाठीशी घालत आहे.
“पोलिसांनी रुग्णालयात नेण्याचा दावा केला असेल तर आधी पोलिसांनी न्यायालयानं वांगचूक यांना रुग्णालयात नेण्याची दिलेली ऑर्डर दाखवावी. कारण न्यायालयानं वांगचूक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्ती केली. याआधीही अनेक उपोषण झालेली आहेत. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात महात्मा गांधी यांनी उपोषण केली. चर्चा केल्यानंतर उपोषण सोडली जात होती. समाजसेवक अण्णा हजारे यांनीही उपोषण केलं. काँग्रेसचं सरकार असताना चर्चा करून उपोषण सोडवलं होतं. आताही वेळ गेलेली नाही, सरकारनं त्यांच्याशी चर्चा करायला हवी आणि त्यांची उपोषण सोडवायला हवं”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“20 जुलै रोजी होणारा मोर्चा निघाला पाहिजे. जनतेच्या आणि युवकांच्या प्राणाची यांना चिंता नाही. आपलं म्हणणं खरं करणं याला हुकूमशाही म्हणतात, तेच हे सरकार करत आहे”, असं म्हणत ठाकरेनी मोदी सरकारवर निशाणा साधला
Forcing One’s Own View Is Dictatorship: Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा