भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक, शरद पवारांची भीती

विशेष प्रतिनिधी

बारामती: भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला तरी आतापर्यंत समोर आलेल्या बाबींवरून भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंता निर्माण होत असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची तरतूद या करारात असल्याची शक्यता असून देशातील शेती व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकते असे ते म्हणाले.

भारत–अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना पवार यांनी अमेरिकेने भारतातून जाणाऱ्या वस्तूंवरील करांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. मात्र या कर कपातीसोबतच कृषी क्षेत्रात अमेरिकेला भारतात निर्यात करण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अमेरिका हा आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देश असल्याने त्यांच्या उत्पादनांचा इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्यास स्थानिक उत्पादकांवर त्याचा परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. Sharad Pawar



भारतीय कृषी क्षेत्रावर तसा परिणाम होऊ नये, ही अपेक्षा व्यक्त करत पवार म्हणाले की, कराराचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतरच सविस्तर भाष्य करणे योग्य ठरेल. सध्या ज्या बाबी जाहीर झाल्या आहेत, त्यावरून शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे आवश्यक आहे, हे मात्र निश्चित आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने अशा कोणत्याही निर्णयाचा परिणाम व्यापक असतो, याची जाणीव ठेवून पुढील पावले उचलली जावीत, असे त्यांनी सुचवले. Sharad Pawar

केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना शरद पवार म्हणाले, संसदेत अर्थसंकल्प सादर होताना आपण नेहमी उपस्थित असतो, मात्र अजित पवार यांच्या अपघातामुळे यावेळी दिल्लीला जाता आले नाही. सभागृहात थेट उपस्थित राहून अंदाजपत्रक ऐकण्याची संधी मिळाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार काही मुद्दे लक्षात येतात. Sharad Pawar

सामान्य नागरिकांवर नवीन करांचा बोजा टाकलेला नाही, ही बाब समाधानकारक आहे. मात्र अर्थसंकल्पातून विकासाला अधिक चालना देणाऱ्या ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती. केवळ करसवलती किंवा कर न वाढवणे यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अधिक ठोस निर्णय आवश्यक होते. विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक असलेले काही निर्णय अर्थसंकल्पात दिसून आले नाहीत, असे ते म्हणाले.

New India–US Trade Deal Could Hurt Agriculture, Warns Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या