विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadanvis राज्यातील शहरे सुरक्षित आणि भयमुक्त करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे अधिक मजबूत करतानाच, या व्यवस्थेच्या सनियंत्रणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. खासगी सीसीटीव्हीचा डेटा संकलित करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्मार्ट सुरक्षा कवच निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे.CM Fadanvis
विधानभवनात माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंत्री आशिष शेलार, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी म्युजिक (महाराष्ट्र अनमँड सिस्टीम अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन) या नव्या महामंडळाच्या निर्मितीच्या सूचना दिल्या. यातून कृत्रिम बुद्धिमत्ता व ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय कामे मानवी हस्तक्षेपाशिवाय अधिक गतिमान केली जातील.CM Fadanvis
शहरांत इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर उभारले जाईल. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढवतानाच त्याच्या विघातक वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन धोरण आखण्याचे आदेशही त्यांनी दिले. महासारथी पोर्टलवरील डेटाचा उपयोग योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावा, या दृष्टीने महासारथी धोरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शासकीय कामांमधील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे धोरण राज्याने निश्चित केले आहे. सूक्ष्म व लघुउद्योगांना एआय सेवा पुरवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली जाणार असून, ड्रोन निर्मिती आणि त्यातील सॉफ्टवेअर संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल. म्युजिक महामंडळाच्या माध्यमातून मानवरहित यंत्रणा आणि पायाभूत सुविधांच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, याची खबरदारी नवीन धोरणात घेण्यात आली आहे.
CM Fadanvis Orders Stronger CCTV Security Network in Cities
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास