रूपाली चाकणकरही करतात तंत्रमंत्र विद्या, सुषमा अंधारे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भोंदूबाबा अशोक खरात याच्यात घरगुती संबंध होते. त्या तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिकाही कापली होती. या प्रकरणी त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. Rupali Chakankar

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भोंदूबाबा अशोक खरातशी कथित संबंध असल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची व त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या नार्कोटेस्टचीही मागणी केली. त एका पीडितेचा दाखला देत म्हणाल्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. Rupali Chakankar



यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. Rupali Chakankar

सुषमा अंधारे म्हणाल्या, रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे.

“Sushma Andhare Alleges Rupali Chakankar Practices Occult Rituals”

महत्वाच्या बातम्या