विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amol Mitkari महाराष्ट्रातील युवा वर्गाला प्रेरित करण्याची क्षमता आणि पक्षाच्या धोरणांना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची ताकद जय पवार यांच्यामध्ये आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाला नवीन ऊर्जा मिळून संघटन अधिक गतिमान होईल, असा विश्वास वाटतो. तरी आपणास विनंती आहे की, विधान परिषदेच्या या रिक्त जागेसाठी जय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.Amol Mitkari
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 30 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील विधान परिषदेची मुदत संपत आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमोल मिटकरी यांनी स्वत: जय पवार यांना संधी देण्यासाठी पक्षाला पत्र लिहीलं आहे.Amol Mitkari
पक्षाला लिहिलेल्या अमोल मिटकरी म्हणाले की, सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी विविध स्तरावर चर्चा सुरू असून, या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. अशा वेळी पक्षाच्या भविष्यातील बळकटीकरणाचा व विस्ताराचा दूरदृष्टीने विचार करून निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्षम, अभ्यासू, ऊर्जावान आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे नेतृत्व पुढे येणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार हे एक सक्षम, समर्पित व विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या कार्यशैलीत सातत्य, संघटनात्मक समज आणि जनसंपर्काची ताकद दिसून येते, जे पक्षाच्या विस्तारासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Amol Mitkari demands Jay Pawar’s nomination for Legislative Council
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन