विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.यात महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाला २ जागा मिळत आहेत.
शिंदे गटाला मिळालेल्या दोन जागांसाठी ८ जणांच्या नावाची चर्चा आहे,त्यातील नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांचा नावाला पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे.महत्वाच म्हणजे,नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नाव सध्या आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.पक्षातील विरोध शांत करण्याचे काम आता एकनाथ शिंदे यांना करावे लागणार आहे.
विधानपरिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे,रविंद्र फाटक,संजय मोरे,किरण पावसकर,शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत आणि बच्चू कडू ही आठ नाव चर्चेत आहेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती,त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे.
बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेना विरोध…
दरम्यान,बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच पक्षातूनच त्यांना विरोध होतोय.पक्षातील नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची मागणी नेत्यांकडून होत आहे.नेत्यांकडून बच्चू कडूंचा नावाला विरोध करताना,बच्चू कडूंनी विधानसभेत पराभूत झाल्यानंतर महायुती सरकारबाबत घेतलेल्या भूमिकेचे कारण दिले जात आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचा किव्वा बच्चू कडूंचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही.मात्र,त्यांना शिंदे गटातून विधान परिषदेची उमेदवारी द्यायची असेल, तर बच्चू कडूंनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिंदे गटात विलीन करावा,अशी अट शिवसेनेच्या काही नेत्यांनी ठेवली आहे.
Shiv Sena opposes Gorhe-Kadu’s name; Eknath Shinde’s dilemma increases…
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल