Nitesh Rane : चिखलफेक केल्याप्रकरणी मंत्री नितेश राणे यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitesh Rane मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने एका महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.Nitesh Rane

काँग्रेसमध्ये असताना नितेश राणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना मुंबई-गोवा महामार्गावरील चिखळ व खड्ड्यांबाबत जाब विचारला होता. त्यावेळी त्यांनी गडनदी पुलावर प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. सर्वसामान्य जनता या मार्गावर दररोज चिखलाचा मारा सहन करते. आज तुम्ही अनुभवा, असे म्हणत नितेश राणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केले होते. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 342, 331, 324, 147, 143, 148, 149, 323, 120 ब, 504, 506 आणि सर्वाजनिक मालमत्तेचे नुकसान अधिनियम (3) नुसार नितेश राणे, नगरसेविका मेघा गांगण, संदीप मेस्त्री, मामा हळदिवे, निखिल आचरेकर, संदीप सावंत या सहा जणांसह अन्य 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.Nitesh Rane



तत्कालीन आमदार नितेश राणे यांना 2019 अटक करण्यात आली होती. तसेच नितेश राणे यांच्यासह 56 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, चिखलफेक प्रकरणात भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. मात्र एका कलमांतर्गत नितेश राणे यांना एका महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे. याप्रकरणी नितेश राणे यांच्या वकिलांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

चिखलफेक प्रकरणात सुनावणी पार पडली. यावेळी भादंवि कलम 353, 332 व 506 कलमांतर्गत नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष सुटका झाली आहे. पण नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करत गडनदी पुलावर प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. त्यामुळे 504 कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात न्यायालयात लवकरच रिव्हिजन दाखल करणार असल्याची माहिती संग्राम देसाई यांनी दिली आहे.

Minister Nitesh Rane sentenced to one month jail for mudslinging case

महत्वाच्या बातम्या