विधान परिषदेसाठी बच्चू कडू निर्णय घेणार; प्रहारचे शिवसेनेत विलिनीकरण होणार?

विशेष प्रतिनिधी

पुणे:राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, येत्या काही तासांत ते महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून कडून बच्चू कडू यांना पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.



दरम्यान, विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावावर गंभीरपणे विचार सुरू आहे. ग्रामीण भागात मजबूत जनाधार, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी आक्रमक भूमिका, तसेच विदर्भात असलेला प्रभाव लक्षात घेता बच्चू कडू यांना विधान परिषदेत पाठवण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बच्चू कडू हे सध्या त्यांच्या स्वतंत्र राजकीय ओळखीच्या प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाचे नेतृत्व करत असल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिवसेनेतील काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करण्याच्या शक्यतांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. बच्चू कडू यांची राजकीय ताकद, आणि भविष्यातील भूमिका यावर या चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बच्चू कडूंचा प्रवेशाने विदर्भात शिवसेनेला बळकटी मिळणार…

बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक आहेत.२०१९ मध्ये त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे २ आमदार निवडून आले होते.२००४,२००९,२०१४ आणि २०१९ मध्ये ते अचलपूर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते.विदर्भ आणि अमरावती जिल्ह्यात बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्षाची ताकद आहे.बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करून शिंदेंसोबत आले तर शिवसेनेची विदर्भात ताकद वाढू शकते.

Bachchu kadu will take a bitter decision for the Legislative Council; Will Prahar merge with Shiv Sena?

 

महत्वाच्या बातम्या