शिरूरमध्ये रस्त्यावरच महिलेची प्रसूती, राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशीचे आदेश

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेण्यास नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. NCW

गाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित महिला प्रसूती वेदनांमध्ये असताना शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेली होती. मात्र, तिला प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप आहे. तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने तिला रस्त्यावरच बाळाला जन्म द्यावा लागला. स्थानिक नागरिक आणि एका डॉक्टरने पुढाकार घेत आई व नवजात बाळाला मदत केली.



आयोगाने म्हटले आहे ही अत्यंत गंभीर आहे. आपत्कालीन मातृत्व आरोग्य सेवा आणि संस्थात्मक प्रसूती व्यवस्थेमधील मोठ्या त्रुटी या प्रकरणातून स्पष्ट होत असल्याचे आयोगाने नमूद केले. प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सन्मानाने प्रसूती करण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रसूती करणे भाग पडणे हा तिच्या आरोग्य, गोपनीयता आणि सन्मानाच्या अधिकाराचा गंभीर भंग आहे.

या प्रकरणी सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मातृत्व आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Woman delivers baby on roadside in Shirur, NCW orders probe

महत्वाच्या बातम्या