विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून काॅंग्रेस पक्षाने आडमुठी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये वादंग झाले हाेते. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काॅंग्रेसला सुनावले हाेते. अखेर विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली असून, आपला उमेदवार उतरवण्याचा हट्ट सोडला आहे.
उद्धव ठाकरेंचा निर्णय हा मविआचाच निर्णय आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अंबादास दानवे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केल्याने काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. तसेच या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवण्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी दिले होते. दरम्यान, विधान परिषदेच्या उमेदवाराची निश्चिती करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांची शुक्रवारी सकाळी गांधी भवन येथे बैठक झाली. या बैठकीत काही वेळाने ठाकरे गटाचे नेते दाखल झाले. तसेच तिथे झालेल्या चर्चेनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धवसेनेत उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा सुटला आणि काँग्रेसने अंबादास दानवे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
Ambadas Danve named MVA candidate after Congress drops claim to the seat
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यां