Eknath Shinde : मी जे काही करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून काहीही: खरात प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Eknath Shinde खरात हा माणुसकीला काळिमा आहे, अशा वृत्तीला थारा देणार नाही, असे सांगत मी जे काही करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून काहीही करत नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.Eknath Shinde

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, मी करतो ते मोकळेपणाने करतो, मी लपून छपून काही करत नाही. मी शिर्डीत गेलो होतो, दोन मंत्री होते, मीडियाही माझ्यासोबत होता. एका कार्यकर्त्याने सांगितले, आता कुणाच्या कपाळावर काय लिहिलेलंय का? आपण काय कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतो का? तसेच खरात हा माणुसकीला काळिमा आहे, अशा वृत्तीला थारा देणार नाही. ती आमची वृत्ती नाही. खरातला त्याची सजा होणारचEknath Shinde



आमदार दीपक केसरकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतो, मात्र तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळावर त्याचे ‘कॅरेक्टर सर्टिफिकेट’ लिहिलेले नसते.

एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती विजयी घोडदौड करत आहे. कुठे ना कुठे काही होतेच, पण माझा भर सकारात्मक कामावर आहे. तसेच उद्धव ठाकरे भाजपजवळ जात असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना शिंदे म्हणाले, मला काय फरक पडतो? पण त्यांना जवळ तर घ्यायला पाहिजे, असे उत्तर शिंदे यांनी दिले आहे.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा आढावा घेताना एकनाथ शिंदे यांनी 1 मे रोजी लोकार्पण होणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ या ऐतिहासिक प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले आणि समृद्धी महामार्गाच्या निर्मितीदरम्यानच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. अभियांत्रिकीचा चमत्कार ठरणारा हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प प्रवासातील वेळ, इंधन आणि अपघातांमध्ये मोठी बचत करेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी घाटातील प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

I do everything openly, nothing to hide: Eknath Shinde on Kharat

महत्वाच्या बातम्या