CM : नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

मुंबई: CM  पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी सांगितले.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. भिमराव कांबळे असे आरोपीचे नाव आहे. त्याने मृत चिमुकलीला वासरू दाखवण्याचा बहाणा करत गुरांच्या गोठ्याकडे नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.CM



मुख्यमंत्री म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. तीन साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला व खूनही केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेमुळे समाजात रोष निर्माण झाला आहे. सर्वांनाच मुलगी व तिच्या कुटुंबीयांबद्दल हळहळ वाटत आहे. मी आश्वस्त करू इच्छितो की, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल.

या प्रकरणी विशेष फास्टट्रॅक कोर्ट स्थापन करण्यासाठी सरकारतर्फे हायकोर्टाला विनंती केली जाईल. तसेच स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही कोर्टापुढे करणार आहोत.

विरोधकांना फटकारताना मुख्यमंत्री म्हणाले, हे अत्यंत असंवेदनशील आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणे याहून अधिक वाईट काहीच असू शकत नाही. काही गोष्टीत तरी संवेदना पाळली पाहिजे. त्यांनी काही केले तरी हरकत नाही. पण राज्य सरकार जे करायला पाहिजे, ते नक्की करेन, असे ते म्हणाले.

CM assures fast-track trial and death penalty push in Nasrapur rape-murder case

महत्वाच्या बातम्या