Sanjay Dina Patil : पत्रकारांना दमबाजी करणाऱ्या संजय दिना पाटील यांचा अखेर माफीनामा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Sanjay Dina Patil  पत्रकारांशी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आणि दमबाजीवर राज्यभरात वाद निर्माण झाल्यानंतर नुकतेच पक्षांतर केलेले आणि आता शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार संजय दिना पाटील यांनी अखेर जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी पत्रकारांची माफी मागत, आपल्याकडून अपशब्द निघणे ही चूक असल्याची कबुली दिली. त्याचबरोबर आपल्या कुटुंबीयांना या वादापासून दूर ठेवण्याची भावनिक विनंतीही त्यांनी केली.Sanjay Dina Patil

ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सातत्याने टीका आणि वैयक्तिक आरोप सहन करावे लागत असल्याचा दावा करत संजय दिना पाटील म्हणाले की, पत्रकारांशी झालेला वाद दुर्दैवी होता. “जे घडलं त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून चुकीने अपशब्द निघाले, त्याबद्दल मी संपूर्ण पत्रकार बांधवांची माफी मागतो,” असे त्यांनी म्हटले.Sanjay Dina Patil



पाटील यांनी सांगितले की, पत्रकारांनी त्यांना वारंवार त्याच विषयावर प्रश्न विचारले. आपण हात जोडून विनंती करूनही प्रश्न विचारणे सुरूच राहिले. यावेळी आपल्या पत्नी, मुलगी, वडील आणि कुटुंबीयांबाबतही चुकीच्या आणि अपमानास्पद गोष्टींचा उल्लेख करण्यात आल्याने आपण संतापलो आणि त्यातून हा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“माझ्यावर टीका करा, माझ्या राजकीय निर्णयांवर प्रश्न विचारा, पण माझ्या कुटुंबाला या वादात ओढू नका,” अशी भावनिक विनंती त्यांनी केली. आपल्या दिवंगत आईवडिलांबाबत आणि कुटुंबीयांबाबतही अपमानास्पद वक्तव्ये होऊ नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पत्रकारांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबई पत्रकार संघाने आंदोलन छेडले होते. हा मुद्दा विधानसभेतही गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीतील नेत्यांना अशा प्रकारची भाषा आणि वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर संजय दिना पाटील यांनी हा व्हिडिओ जारी करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Sanjay Dina Patil Issues Apology After Intimidating Journalists

महत्वाच्या बातम्या