विशेष प्रतिनिधी
मुंबई : वाल्मिकी कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा सहकारी आहे, त्यांच्या कंपन्या मध्ये भागीदारी आहे. त्यामुळे मुंडे यांच्याकडे मंत्रिपद असेल तर निष्पक्ष चौकशी होणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना बाजूला करावे, मगच चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले, वाल्मिकी कराड धनंजय मुंडे यांचा सहकारी आहे, त्यांच्या कंपन्या मध्ये भागीदारी आहे. अश्या व्यक्तीची चौकशी कशी होणार?
छगन भुजबळ यांच्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झालं हे तेवढेच खरे आहे. महायुतीने मत घेतली. तिघांनी वापरले. सत्ता आली आणि बाजूला केले. त्यामुळे भुजबळ नवा पर्याय शोधत असतील . ते निर्णय काय घेतात यावर ओबीसी समाज ठरवेल. भुजबळ यांनी जी भूमिका घ्यायची ती पद आणि सत्तेसाठी घेऊ नये.ओबीसी चळवळीसाठी घ्यावी आम्ही त्यांना साथ देऊ.
- मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
वडेट्टीवार म्हणाले, मराठी माणसावर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हल्ले होतात, अपमान होत आहे. जिवानिशी मारण्याचे प्रकार होत आहे. याचे कारण आहे सरकार त्यांचे आहे. मराठी माणसाचे सरकार नाही. त्यामुळे परप्रांतीयांचा विश्वास दुणावला आहेउद्या त्यांना शहरात ,वॉर्डातील मराठी माणूस नको असेल. सरकारला वाटते परप्रांतीयांमुळे सरकार आले आहे. मराठी लोकांना ते हद्दपार करणार आहेत.
परभणीतील घटनेवर ते म्हणाले, लोकांचा जीव जाईपर्यंत मारहाण केली.कितीही म्हणू दे कोंबींग ऑपरेशन झाले नाही. पण ते झाले. शवविच्छेदन अहवाल आहे. कोणी आवाज केला तर मारून टाकू अशी वृत्ती आहे.आणि काही झालं तर पाच दहा लाख देऊ. ही सरकारची मानसिकता विकृत आहे. यामुळे राहुल गांधी यांनी भेटून सरकार बाबत, पोलीस मारहाणीबाबत आवाज उठवला.
Dhananjaya Munde should be removed from the post of Minister, Vijay Wadettiwar demanded
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा