विशेष प्रतिनिधी
बीड : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले आहे.
आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल असून त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहे. घटनेला 22 दिवस उलटून देखील आरोपी सापडले नसल्याने नागरिकांनी हे आंदोलन केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडने कल पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( सीआयडी) कार्यालयात स्वतः येऊन शरणागती पत्करली होती.
वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप सापडले नाहीत. त्यांची हत्या झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी व्यक्त केला होता.
जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.
Jalsamadhi protest of villagers in Massajog demanding arrest of accused in Deshmukh murder case
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट