विशेष प्रतिनिधी
नागपूर :महाराष्ट्र विधानसभेत मिळविलेल्या दैदिप्यमान विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता दिल्ली दिग्विजयासाठी लढणार आहेत. भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीत दोघांचाही समावेश केला आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर फडणवीस आणि गडकरी दिल्ली विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे भाजपने आतापर्यंत ५८ उमेदवारांची घोषणा केली असून अद्याप १२ उमेदवारांची नावे जाहीर होणे बाकी आहे.
त्यानंतर बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांचा समावेश आहे.
त्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींना स्थान मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १३२ जागा मिळाल्या आहे. महाराष्ट्राच्या या यशामुळे फडणवीस आणि गडकरींचे दिल्लीतील वजन वाढले आहे.
Devendra Fadnavis and Nitin Gadkari Star campaigner in the field for Delhi
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती