विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ladki Bahin Yojana नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.Ladki Bahin Yojana
निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० रुपयांवरून पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास २१०० रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा केली होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं.
मात्र, राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे २१०० रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की नाही? तसेच मिळणार असतील तर कधी? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यावरून विरोधकांनीही अनेकदा सवाल उपस्थित केले आहेत.
आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, आम्ही याबाबत आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत
In Ladki Bahin Yojana Rs 2100 will get only after presenting the new budget
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती