विशेष प्रतिनिधी
बीड : वाल्मिक कराड याच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीच्या बातम्या येत आहेत. पुण्यापासून अनेक ठिकाणी आलिशान फ्लॅट, घरे, कार्यालये असल्याचे म्हटले जात आहे. मात्र वाल्मिक कराडच्या बायकोच्या शेतात काम करणाऱ्या कामागारावर उपासमारीची वेळ आली आहे.
वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर ही उपासमारीची वेळ आली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे या कुटुंबाला गेल्या तीन महिन्यापासून मजुरी न मिळाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे .
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मीक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव तिच्या नावावर 36 एकर जमीन असल्याचं ट्विट केले होते. गेल्या सात महिन्यापासून काम करणाऱ्या माणिक शिंदे माने यांचे कुटुंब मंगल ज्योती शिंदे यांच्या शेतात काम करतात.
मात्र गेल्या तीन ते चार महिन्यापासून ज्योती मंगल जाधव यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न केल्याचं पुढं आले आहे. शेत जमिनीवर काम करणाऱ्या शिंदे माने कुटुंबीयाला दुसऱ्यांच्या शेतात कामावर जाण्याची वेळ आली आहे.
शिंदे कुटुंब गेल्या तीन महिन्यापासून मुलांना मिळणाऱ्या शाळेतील तांदुळावर भूक भागवण्याची वेळही आली आहे.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील दोषी वाल्मिक कराडच्या नावावर बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापुरात संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या शेतात काम करणाऱ्या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळाला नाही.
वाल्मिक कराडची अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचे उघड झाले. वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत. बीड, परळी, पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर सोलापुरातही वाल्मिक कराडची संपत्ती असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव कोट्यावधी संपत्तीची मालक असून तिच्या नावे बार्शीत जवळपास ३५ एकर शेती आहे. परंतु, या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या अनेक कुटुंबाला गेल्या तीन- चार महिन्यापासून पगार दिला जात नाही.
A time of starvation on the farm laborers of Walmik Karad’s wife
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती