विशेष प्रतिनिधी
पुणे : Muralidhar Mohol महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन व्हायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.Muralidhar Mohol
बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्यूदो हा खेळ माझ्या आवडत्या कुस्ती खेळाशी खूप साम्य असून यातील डावही कुस्तीमध्ये वापरले जातात त्यामुळे ज्यूदो आणि कुस्ती हे युद्धकलेचे खेळ, भाऊ-भाऊच आहेत.
प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. यावेळी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील सहभागी पदक विजेत्यांसाठी रोख दहा लाख रुपयांची बक्षिसांची घोषणा केली, यामध्ये सुवर्णपदक विजेत्यास 11,000 रुपये, रोप्य पदक विजेत्यास 7000 रुपये तर दोन्ही कांस्यपदक विजेत्यास पाच हजार प्रत्येकी असे बक्षीस जाहीर केले.
इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे तथागत मुखर्जी आणि ज्यूदो फेडरेशनचे पदाधिकारी वीरेंद्र वशिष्ठ, सी एस राजन यांसह द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त जीवन शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोलंकी, राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
समारंभास पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारे यांना विशेष आमंत्रित केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.
स्पर्धेसाठी सबज्युनियर गटामध्ये 29 राज्यातील 235 मुले आणि 230 मुली खेळाडू सहभागी झाले आहेत.
Will try to organize National Games in Pune, MP Muralidhar Mohol testified
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती