विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Sanjay Roy आर. जी. कर रुग्णालयात एका महिला डॉक्टरची बलात्कार करून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. हा गुन्हा दुर्मिळातला दुर्मीळ आहे असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.Sanjay Roy
कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणी आता आरोपी संजय रॉयला शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला आहे. सीबीआयने या प्रकरणात आरोपी संजय रॉयला फाशी द्यावी अशी मागणी केली आहे.
संजय रॉयच्या अटकेनंतर सुमारे सहा महिन्यांनी सहा महिन्यांनी शनिवारी विशेष न्यायालयाने संजय रॉयला बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवलं. गुन्ह्याच्या तीव्रतेमुळे जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा होण्याची शक्यता न्यायाधीशांनी व्यक्त केली होती. मात्र, पीडिता प्रशिक्षणार्थी असलेल्या
कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.
मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. ९ ऑगस्ट २०२४ ला ही घटना घडली होती. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. या घटनेतले नवे पैलू रोज समोर येत होते. तसंच आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील ट्रेनी विद्यार्थ्यांनी सुमारे दीड महिना आंदोलन केलं होतं. कोलकाता बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय हा रुग्णालयातील डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी आणि तिची हत्या करण्याआधी तो रेड लाइट एरियात गेला होता अशी माहिती समोर आली होती. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. सेलदाह कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु असून आज दुपारी २.४५ वाजता संजय रॉयला शिक्षा सुनावली जाणार आहे.
पोलिसांच्या चौकशीत संजय रॉयने गुन्हा मान्य केला आहे. ट्रेनी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपली होती तेव्हा तिच्यावर बलात्कार केल्याचं संजय रॉयने मान्य केलं. संजय रॉय हा त्या दिवशी रात्री दोन ते तीनवेळा हॉस्पिटलमध्ये आला होता. एकदा त्याने ऑपरेशन थिएटरचं दारही तोडलं अशीही माहिती पोलिसांनी दिली. नंतर सदर प्रकरण जेव्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं तेव्हाही अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले होते.
Sanjay Roy convicted in rape and murder case, court observes rarest of rare crime
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
- Dhananjay Munde धनंजय मुंडे आता तरी राजीनामा द्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे आवाहन
- Saif Ali Khan सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड
- Ashwini Vaishnav भारतातील डिजिटल क्रांतीचा दावोस येथे जयघोष




















