माझे पूर्वज हिंदू होते, त्यामुळे मी कमी पाकिस्तानी का? पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या सवालाने नव्या वादाला फुटले ताेंड

विशेष प्रतिनिधी

कराची : पाकिस्तानात हिंदू शासकांचा इतिहास जवळपास पुसला गेला आहे. आपण चंद्रगुप्त मौर्य, अशोक यांचा इतिहास पुस्तकातून हटवला आहे कारण ते हिंदू होते. माझे पूर्वज हिंदू होते, त्यामुळे मी कमी पाकिस्तानी ठरतो का असा प्रश्न पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. त्यामुळे नव्या वादाला ताेंड फुटले आहे. Pakistani

एका मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले की, आपण पाकिस्तानी मुस्लिम आपल्या हिंदू पूर्वजांचा द्वेष करतो. पाकिस्तानचे निम्मे लोक खोटा दावा करतात, त्यांचे पूर्वज सौदी अरेबिया अथवा इराणहून आले होते. हा विचार जाणुनबुजून तयार करण्यात आला आहे जेणेकरून पाकिस्तानची नवी पिढी आपल्या संस्कृतीच्या अस्मितेपासून दुरावली जावी. पाकिस्तानात शिकवली जाणारी पुस्तके अशा लोकांनी लिहिली आहेत, ज्यांनी भावी पिढ्यांना एका विशिष्ट मानसिकतेत घडवण्याचा प्रयत्न केला.



पाकिस्तानी समाजाचं वास्तव बदललं!सध्या समाजाची मानसिकता बदलली आहे आणि अमेरिकेच्या युद्धांमध्ये पाकिस्तानचा वापर करण्यासाठी त्यानुसार इतिहास मांडला जात आहे. आमची मुले खरा इतिहास शिकत नाहीत. आज पाकिस्तानातील अनेक लोकांना चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक कोण होते हे देखील माहीत नाही असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांना अब्राहम करारात सामील होण्याचे आणि इस्रायलला मान्यता देण्याचे आवाहन केले होते. मात्र, आसिफ म्हणाले, माझ्या व्यक्तिगत मतानुसार पाकिस्तान अशा कुठल्याही करारात सहभागी होणार नाही जो देशाच्या मूळ विचारधारेविरोधात आहे.

पाकिस्तानची भूमिका आजही कायम आहे आणि जोपर्यंत पूर्व जेरुसलेमला राजधानी बनवून १९६७ च्या सीमेवर आधारित एक स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत इस्लामाबाद इस्रायलला मान्यता देणार नाही. पाकिस्तानने आपल्या ७८ वर्षाच्या इतिहासात कधीच इस्रायलला अधिकृत मान्यता दिली नाही. पाकिस्तानी पासपोर्टवरही इस्रायल दौरा मान्य नाही असा स्पष्ट उल्लेख आहे.

My ancestors were Hindus, so am I less Pakistani?” Defence Minister’s remark sparks fresh controversy

महत्वाच्या बातम्या