विशेष प्रतिनिधी
सातारा : तुम्ही चित्रपटाचं दिग्दर्शन खूप सुंदर केलं आहे. त्यातले एखाद दुसरे दृश्य जे आहे ते आपण इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन केलं, तर आता कारण नसताना जी कॉन्ट्रोव्हर्सी होतेय ती संपेल, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. यावर छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत लेझिम दृश्य बदलण्याची ग्वाही दिली.
चित्रपटामध्ये फक्त आपले राजे किती थोर होते, हेच दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे तज्ज्ञांना दाखवून जे काही बदल करायचे आहेत, ते आपण नक्की करू, असे लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले.
विकी कौशल व रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर आल्यानंतर ‘छावा’ सिनेमा वादात अडकला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहेत, यावरून वाद सुरू झाला आहे. या सीनसंदर्भात उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फोन केला आहे.
चित्रपटात जर काही आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली असतील तर ती बदलून लोकांपर्यंत चांगला चित्रपट लवकरात लवकर पोहोचावा. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी, धर्मासाठी केलेले योगदान हे चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर यावे, अशी सूचना उदयनराजे यांनी लक्ष्मण उतेकर यांना दिली. उतेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत चित्रपटात तज्ज्ञांशी बोलून बदल करण्याची ग्वाही दिली.
‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारीला रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या नृत्याच्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. काही संघटनांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही सिनेमाच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास जगभरात जाणार आहे. पण त्यांनी ट्रेलरमध्ये महाराज नृत्य करताना दाखविल्यामुळे ते लोकांना कितपट पटेल, याबाबत शंका वाटते; असं म्हटलं होतं.
Udayanaraje’s Phone call and Chhava movie sceneswill change
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार