विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Budget 2025 केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. त्यामुळे प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता वार्षिक १२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. गेल्या ४ वर्षांचे आयटी रिटर्न एकत्रितपणे दाखल करता येऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली आहे.Budget 2025
करदात्यांचे १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपये असेल, तर त्याला ८० हजार रुपयांची करात सूट मिळेल. त्यामुळे त्याचा १०० टक्के कर माफ होईल. एखाद्या करदात्याचं उत्पन्न १८ लाख असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ७० हजारांचा फायदा होईल. याचा अर्थ त्याचा ३० टक्के कर कमी होईल. २५ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा १ लाख २५ हजारांचा कर कमी होईल, अर्थात त्याला २५ टक्के कर कमी भरावा लागेल.
अशी असेल नवी कररचना
2020 च्या अर्थसंकल्पात जेव्हा सरकारने नवीन कर प्रणाली लागू केली, तेव्हा लोक ती स्वीकारण्यास तयार नव्हते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. आयकर दात्यांना जुन्या कर प्रणाली नवीन कर प्रणालीपेक्षा चांगली आणि अधिक फायदेशीर वाटत होती. पण आता देशातील 65 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे.
किती बदलला टॅक्स
0 ते 4 0%
4 ते 8 5%
8 ते 12 10%
12 ते 16 15%
16 ते 20 20%
20 ते 24 25%
24 लाखापुढे 30%
Budget 2025 no income tax up to an income of Rs 12 lakhs
महत्वाच्या बातम्या
-
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
-
Ajit Pawar जीबीएस सिंड्रोमवर शासनातर्फे मोफत उपचार, अजित पवारांची माहिती
-
Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसले भारताच्या सशस्त्र दलांचे शक्तिप्रदर्शन