विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडूक काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विखारी टीका केली होती. फडतूस, तू राहतो की मी अशी भाषा वापरली होती. मात्र डेबेन्द्र फडणवीस यांनी यावर अत्यंत समतोल भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांच्याशी आपले संबंध चांगले आहेत असे सांगताना जान के प्यासे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.Uddhav Thackeray
लोकसत्ता या दैनिकाच्या एका कार्यक्रमात मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि माझी सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे. बाकी कधी भेट झाली नाही. आमच्यातील संबंध कधीच असे नव्हते की आम्ही भेटलो आणि नमस्कार केला नाही. आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो. तसा संबंध आहे. साऊथ भारतात जसे नेते जान के प्यासे असतात तशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी राहिली नाही. त्यामुळे संवाद करायला, बोलायला काही अडचण नाही.
उद्धव ठाकरेंना चंद्रकांत पाटील भेटले, पण त्यातून अशा बातम्या झाल्या की उद्याच उद्धव ठाकरे आमच्याबरोबरच येणार आणि चंद्रकांतदादांनी त्यांच्यासाठी पायघड्याच अंथरल्या आहे. आमच्यातील संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही, पण याचा अर्थ असा नाही की ते आता जवळ येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
About Uddhav Thackeray, Fadnavis says We are not Jan Ke Pyase
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन