Dhananjay Munde : कोट्यवधी रुपये सभा आणि अभिनेत्रींवर खर्च , करुणा मुंडे यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा

Dhananjay Munde : कोट्यवधी रुपये सभा आणि अभिनेत्रींवर खर्च , करुणा मुंडे यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Dhananjay Munde कोट्यवधी रुपये हे सभा आणि अभिनेत्रींवर खर्च करतात, कुठुन येत हे… हे आका लोकं तर त्यांना जमवून देतात. आका म्हणजे वाल्मिक कराड आणि “बाप तो बाप रहेगा” आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, ज्यांच्या सांगण्यावर हे सगळ सुरु आहे, असा आरोप करत करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.Dhananjay Munde

करुणा मुंडे यांनी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट दिली . बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धस यांनी आका आणि आकाचा आका असे उल्लेख केले होते. त्यावर करुणा मुंडे म्हणाल्या की, आका म्हणजे वाल्मिक कराड आणि “बाप तो बाप रहेगा” आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, ज्यांच्या सांगण्यावर हे सगळ सुरु आहे… कोट्यवधी रुपये हे सभा आणि अभिनेत्रींवर खर्च करतात, कुठुन येत हे… हे आका लोकं तर त्यांना जमवून देतात… आणि हे आका फक्त एकचं नाही आहेत, पुण्याचा आका वेगळा आहे, सांगलीचा आका वेगळा आहे. हे सगळे भु-माफिया आहेत…



धनंजय मुंडेंची सवय आहे ते स्वतः नाही बोलतं, त्यांनी बोलायला पण लोकं ठेवलेली आहेत… तुम्ही काल पाहिलं असेल की, सदावर्तेंनी माझ्यावर प्रतिक्रिया दिली होती… ते माझ्या माणसांना बोलले की, मी लोकांसोबत बोलायचे पण पैसे घेतो… म्हणजे, समजून जा की धनंजय मुंडेंसाठी किती पैसे घेतले असतील.. ते माझे किंवा माझ्या पतीचे कोणाचे ही वकील नाही, मगं ते आमच्या दोघांमध्ये का बोलत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

वाल्मिक कराडने मला खुप मारहाण केली होती…. बलात्कारी मंत्री बनू शकतो तर, मी का नाही? मी दुसरं लग्न करून मंत्री बनू शकते… माझ्या चारित्र्यावर बोलणाऱ्यांनी आधी स्वतः कडे पहाव… मी देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करते, त्यांनी या प्रकरणात. सीबीआयची नेमणूक करावी, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.

Spending crores of rupees on Rallies and actresses, Karuna Munde targets Dhananjay Munde again

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023