विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एकत्र निवडणूक लढवली असती, तर निकाल वेगळा लागला असता. यातून शिकायला हवे असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. गेल्या दहा वर्षांत भाजप सत्तेत आल्यापासून संसदीय लोकशाही धोक्यात आली असून, विजयासाठी साम, दाम, दंड, भेद हे सर्व वापरण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणात संसदीय लोकशाहीत जय पराजय हार जीत होत असते मात्र मागच्या दहा वर्षात भाजप सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीत निवडणूक होत नाही आहेत.मतदार यादीतील घोळ महाराष्ट्रप्रमाणे इतरही राज्यात आहेत
संजय राऊत यांनी समाजसेवक आण्णा हजारे यांच्यावरही टीका केली. मोदींच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारावेळी ते होते कुठे?अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचा आनंद आण्णा हजारे यांना झाल्याचा आरोपही त्यांनी केला. देश लुटला जातोय एकाच उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जातयं याने लोकशाही टिकेल का?
मुख्यमंत्री नेमकं कोणाला पाठीशी घालत आहेत? बीडची जनता मूर्ख वाटली का?” असा थेट सवाल करत फडणवीस यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा ते सारखे विजय पाहून डिप्रेशनमध्ये गेले आहेत, फडणवीस म्हणतात कोणाला सोडणार नाही. मग अटक का होत नाही? . “जरांगे पाटील यांचे मुद्दे बाजूला टाकण्यासाठी धस यांना पुढे आणले जात आहे का?”असा सवाल त्यांनी केला.
राऊत म्हणाले, २०१९ मध्ये आम्ही भाजपशी चर्चा केली, असं ते सांगतात, मग २०१४ मध्ये काय झालं होतं? भाजपने तेव्हा युती का तोडली?” अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झाली नसती. २०१९ ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणतं आहेत. मग २०१४ ला काय झालं होतं? का भाजपने तेव्हा युती तोडली? शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात भाजपने निवडणूका लढवल्या. आम्ही खूर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते?
If Congress-AAP had fought together, the result would have been different, says Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन