विशेष प्रतिनिधी
जालना : सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे. सरकारचं कौतुक करतो. उदय सामंत यांचा सल्ला मी ऐकला आहे. शिंदे समितीला मुदतवाढ दिली आता मनुष्यबळ देखील द्या अशी मागणी करत 15 तारखेपासून साखळी उपोषण करायचं की नाही, हे उद्या अंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले, ठरलेल्या चारही मागण्या तातडीनं लागू करा. तुम्ही जाणून-बुजून वेळ लावता आणि आम्ही गप्प का बसलो हे सुद्धा आज सांगतो. मंत्री उदय सामंत यांनी एक वक्तव्य केलं होतं की, मित्र म्हणून सल्ला आहे. त्यांनी संयम पाळावा. त्यांचा सल्ला मी मान्य केलेला आहे. आम्ही शांत झालो. आम्ही सन्मानाने सरकारला सहकार्य करत आहे, हे ओळखून घेतलं पाहिजे
शेवटी समाजाच्या लेकरांच हित महत्त्वाचं असतं असे सांगून ते म्हणाले,आपल्या पूर्ण मागण्या आठ होत्या काल .त्यांनी त्या मधल्या चार तात्काळ मंजुरी देतो म्हणून सांगितलं .त्या चार पैकी सुद्धा दोन केल्या, त्यामध्ये एक शिंदे समितीला मुदत वाढ . त्यामुळे आमची एक विनंती आहे शिंदे समितीला मुदत वाढ दिली तिला मनुष्यबळ द्या तिला बसवून ठेवू नका. फक्त मुदत वाढ देऊन उपयोग नाही.
आता प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रभर गेली पाहिजे आणि तिने नोंदी शोधल्या पाहिजे. हे सर्वात महत्त्वाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कक्ष दिले पाहिजे आणि मनुष्यबळ तातडीने दिलं पाहिजे . त्यांना निधी कमी पडता कामा नये. सगळ्या व्हॅलिडीटी झाल्या पाहिजे. जे प्रमाणपत्र रोखून धरले ते तात्काळ दिले पाहिजे. हे आता मुख्य समितीच्या पाठीमागे असलं पाहिजे.
हैदराबाद गॅझेट लागू करतो असं तुम्ही काल शासन निर्णय घेऊन सांगितलं.बॉम्बे गव्हर्मेंट आणि सातारा संस्थान हे आता शिंदे समितीकडे आहे .आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार आहे गॅझेट चा अभ्यास शिंदे समितीने केलेला आहे आता तो सरकारला करायचा आहे. त्यामुळे गॅझेटच्या अंमलबजावणीची वाट आम्ही आता पाहतोय.
जरांगे म्हणाले, मराठा आंदोलकांवर केलेल्या केसेस मागे घ्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे विषयी विषय त्यामध्ये घेतलेले आहे. या चार मागण्या ज्या ठरलेल्या आहेत त्या तातडीने लागू करा
साखळी उपोषणाला बसणार का? यावर जरांगे म्हणाले, त्यामुळे आज संध्याकाळी आम्ही गावकरी मिळालं ठरवतोय. .उद्या सकाळी आंतरवाली मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात जाहीर करू. परंतु आता मागण्या मान्य करायला लागले म्हणून आम्ही सुद्धा बोलणार नाही. फक्त तुम्ही खोटं करू नका हे आमचं मागणं आहे.
Manoj Jarange demanded extension of time for Shinde committee, now also provide manpower
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत