विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार साहेबांवर आम्ही विश्वास ठेवला होता. परंतू, त्यांनी विश्वासघात केल्याचे सिद्ध झाले आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, “शरद पवार साहेबांनी एका गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल संजय राऊतांनी मांडलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. शरद पवार साहेबांवर आम्ही विश्वास ठेवला होता. पण विश्वासघात झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर संजय राऊतांना बोलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर राजकारण चांगलेच पेटले आहे. ठाकरे गट आणि पवार गटात कलगीतुरा सुरू झाला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली होती. काल नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांनी सत्कार केला होता आणि त्यांचे कौतुकही केले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टिका केल्यानंतर त्याला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, मात्र यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आम्ही शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला, मात्र आता आमच्या विश्वासाचा घात झाला असं वाटतं असं संजय राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत यांच्यासोबतच विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांनी देखील शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही शिवसेनेला सुनावले आहे. संजय राऊत यांना तर राजकारणातील सुसंस्कृतिक काय असते याचे धडे दिले.
Sharad Pawar betrayed, criticizes Vinayak Raut
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत