विशेष प्रतिनिधी
मुंबई : समोरच्या लोकांनी बाजार मांडला आहे. पैशांची ऑफर दिली जाते. कामांची ऑफर दिली जात आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार केला जात आहे, असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अंबादास दनवे यांनी केला आहे
.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात आहे. त्यामुळे राजन साळवीसारखे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. हे शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जात आहे? याबाबत अंबादास दानवे म्हणाले, या सगळ्या लोकांनी मांडला आहे. बाजारात मांडलेले लोक जात असतील तर याचा आम्हाला अजिबात दुःख नाही.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करताना दानवे म्हणाले, हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, असे कोकाटे म्हणाले होते. कृषिमंत्री भिकाऱ्यांची उपमा शेतकऱ्यांना देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो, त्यांच्याबाबत ही भाषा शोभणारी नाही. शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देवून सरकार उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर त्यांचे राज्य चालले आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा अनेक अनुदान योजना थांबवल्या आहेत, असे दानवे यांनी म्हटले.
ऑपरेशन टायगर थांबणार नाही असे योगेश कदम म्हणाले होते, त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, योगेश कदम यांना काही माहीत नाही. ते अजून लहान आहेत. त्यांना अजून संघटनाही माहीत नाही. बापाच्या बळावर काम करणे सोपे असते. पण संघटना उभी करणे अवघड असते. या प्रकारच्या घोषणा आणि वल्गना करणारे खूप आले आणि गेले आहेत. उद्धव साहेबांचे नेतृत्वात शिवसेना तळपत्या तलवारीसारखी येत्या काळात उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Ambadas Danve has accused the Shinde group of setting up a market
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत