विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut संजय राऊतांचे आरोग्य बरोबर नाही. ते सकाळी मीडियासमोर येऊन काहीही बडबड करत असतात. ते जबाबदार व्यक्तिमत्व असून प्रत्येक गोष्टीची माहिती घेतल्यानंतरच त्यांनी वक्तव्य करावे, असा सल्ला मंत्री पंकज भोयर यांनी दिला आहे.Sanjay Raut
महायुतीतील मंत्री आणि भाजप नेते पंकज भोयर यांनी पत्रकारांशी बोलताना राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले होते. यावर बोलताना पंकज भोयर यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला.
बीड जिल्ह्यातील मसाजचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जवळजवळ सर्व आरोपींना अटक झालेली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणावर गृह विभाग अत्यंत गंभीर असून योग्य पद्धतीने चौकशी सुरू आहे”, असे पंकज भोयर यांनी सांगितले.
महायुतीच्या काही आमदारांची सुरक्षा काढण्यात आली यावर मंत्री पंकज भोयर यांना विचारले होते. यावेळी ते म्हणाले महायुतीत सर्व ऑलवेल सुरू आहे. सुरक्षेच्या कारणावरून कुठलाही तणाव नाही. सुरक्षेसाठी एक वेगळा डिपार्टमेंट असून सहा महिन्यातून बारा महिन्यातून सर्वे करून कुणाला किती सुरक्षा द्यायला पाहिजे, ते ठरवत असतात”, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. ते फ्रस्टेशनमध्ये असले की अशी वक्तव्य करत असतात, असे पंकज भोयर म्हणाले.