Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Mumbai
मुंबई

Mumbai : मुंबईतील प्रारूप मतदार यादीचा घोळ, 11 लाख 1 हजार 505 नावे ही दुबार

मुंबई महापालिका निवडणूक प्रारूप मतदार यादीतील दुबार मतदारांचा घोळ काही सुटलेला दिसत नाही. महापालिका 1 जुलै 2025 रोजीपर्यंत नोंदविण्यात आलेल्या मतदारांच्या यादीनुसार मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार एकूण मतदारांची संख्या ही 1 कोटी 3 लाख 43 हजार 216 एवढी नोंदवण्यात आलेली आहे. मात्र या यादीत तब्बल 11 लाख 1 हजार 505 नावे ही दुबार आहेत. 4 लाख 33 हजार मतदारांची नावे ही अनेकदा नोंदवण्यात आलेली आहेत. एकाच व्यक्तीचे नाव तब्बल 103 वेळा नोंदविण्यात आल्याचा जागतिक विक्रम झाला आहे.

MVA Erupts
पुणे

प्रारूप मतदार याद्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; पिंपरी चिंचवड महापालिका प्रवेशद्वारावर जाळल्या मतदार याद्या..!

पिंपरी चिंचवड महापालिकने आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्या बाबत महाविकास आघाडी आक्रमक झाली

Sarsanghchalak
देश-विदेश

Sarsanghchalak : राममंदिरासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांच्या आत्म्यास समाधान, सरसंघचालकांचे प्रतिपादन

आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. अयाेध्येत भव्य राम मंदिराचे इतक्या लोकांनी स्वप्न पाहिले, इतक्या लोकांनी प्रयत्न केले, इतक्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; आज त्यांच्या आत्म्याला समाधान मिळाले असेल.

महाराष्ट्र

Manoj Jarange : त्याच्या इतका नीच माणूस नाही, वाल्मीक कराडची आठवण काढल्याने मनोज जरांगे यांची धनंजय मुंडेंवर कठोर टीका

परळीतील प्रचार सभेत भावनिक होत वाल्मीक कराडची आठवण काढल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. असा माणूस जर कुणाला आठवत असेल तर त्याच्याइतका नीच माणूस नाही. सं

देश-विदेश

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सस्पेन्स कायम, ५० टक्क्यांवरील आरक्षण मर्यादा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी शुक्रवारी

Supreme Court : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादा ओलांडण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मोठी घडामोड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र

भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले अशा लोकांच्या हाती तुम्ही सत्ता का देता? अजित पवार यांचा सवाल

अनेक योजनांमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले अशा लोकांच्या हाती तुम्ही सत्ता का देता? चांगल्या लोकांना निवडून का देत नाही? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडकरांना विचारला.

देश-विदेश

Asaduddin Owaisi देशाचे शत्रू ते आपले शत्रू, दिल्ली स्फोटातील आरोपींचा उघडपणे निषेध केला पाहिजे: असदुद्दीन ओवैसी यांचे आवाहन

दिल्ली स्फोटातील आरोपींचा उघडपणे निषेध केला पाहिजे. देशाचे शत्रू आपले शत्रू आहेत. या स्फोटात हिंदू आणि मुस्लिम दोघेही मारले गेले. जर आपण गप्प राहिलो

Shahajibapu Patil
महाराष्ट्र

Shahajibapu Patil : पैशावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका, कुत्री मांजरं म्हणत शहाजीबापू पाटलांचा भाजप नेत्यांना इशारा

पैशावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका. ही लढणारी औलाद आहे.महाराष्ट्र मला घाबरतो, अन् आता ही कुत्री मांजरं मला घाबरवायला लागले आहेत शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. दीपक साळुंखे आणि भाजप नेते व पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शहाजी बापू म्हणाले की- स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनविले, त्यापेक्षा जास्त मोठी गुलामगिरी आली आहे. गणपतराव देशमुख 75 वर्षे आणि मी 51 वर्षे इथे आहे, स्वाभिमानी जनता होती. आता हेलिकॉप्टर घेऊन येत धाड धाड गुंडशाही सुरू केली. निवडणुकीपूर्वी मला माहीत होते भाजपने कंबरडे मोडले. मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत इतका प्रामाणिक वागून माझ्यासोबत का असे वागले?

Dhananjay Munde
मुंबई

Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणाले, परळीच्या मातीसाठी प्राणही द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही

मागील काही महिन्यांपासून परळीवर झालेल्या टीका, आरोप आणि वादांचा उल्लेख करून त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन करत येथील मातीसाठी प्राणही द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही, असा विश्वास माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

Aditya Thackeray
मुंबई

Aditya Thackeray : मतदार यादीतील चुका प्रशासनिक घोळ की गंभीर कट, आदित्य ठाकरे यांचा सवाल

मतदार यादीतील चुकांना साधा प्रशासनिक घोळ म्हणावे की एक गंभीर कट, असा प्रश्न सतत उपस्थित होत आहे. परंतु जर त्यांच्याकडे विचारणा केली, तर हे सर्व एकप्रकारे लोकशाहीला मारक ठरणारे कृत्य असून, स्पष्टपणे देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या श्रेणीत बसणारे आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

Devendra Fadnavis.jpg 2
मुंबई

Devendra Fadnavis : लाेकलचे सर्व डबे एसी, पण तिकिटदरात वाढ नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईकरांना भेट

मुंबईकरांच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनचे सर्व डबे मेट्रोप्रमाणे संपूर्ण वातानुकूलित AC करण्यात येणार आहे. दरवाजे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) पद्धतीने बंद होणारे असतील, मात्र यासाठी तिकिटदरात काेणतीही वाढ केली जाणार नाही अशी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना माेठी भेट दिली आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मनुष्याला संवेदना अभिव्यक्तीचे वरदान लाभले आहे. या अभिव्यक्तीसाठी त्याच्याकडे भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही प्रगल्भ संस्कृती जपण्याची गरज असून हा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून होत असते. नागपूर पुस्तक महोत्सवांतर्गत होत असलेल्या ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून प्रगल्भता येऊन जाणिवा विस्तारित होतील. विविधांगी विषय या फेस्टिव्हलमध्ये मांडण्यात येतील. त्यातून वैचारिक कक्षा रुंदावून प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.