Tejashwi Yadav : तेजस्वी यादवांचा दाखला देत निधीच्या दादागिरीचे अजित पवारांकडून समर्थन
माझे उमेदवार निवडून दिले तर भरपूर निधी देणार, अन्यथा निधीवर काट मारणार अशी ‘दादागिरी’ची भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचारात वापरली हाेती. यावरून विराेधकांनी टीकेची झाेड उठवल्यावर पवारांनी स्पष्टीकरण देताना बिहार निवडणुकीतील तेजस्वी यादवांच्या घाेषणांचा दाखला दिला आहे.











