Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Dr Gauri Palve Garje
मुंबई

Dr Gauri Palve Garje : डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. ,गर्जेची बहीण देखील गौरीला मानसिक त्रास देत होती. म्हणून या प्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जेच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये सत्य बाहेर आले पाहिजे, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केलेली नाही पण त्याला अटक करु असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे, असेही त्या म्हणाल्या.

Nana Patole
महाराष्ट्र

Nana Patole : मालकाची आणि धमकीची भाषा, जनता गर्व चूर करून टाकेल, नाना पटोले यांचा अजित पवारांना इशारा

मालकाची आणि धमकीची भाषा लोकशाहीत चालत नाही. जनता हा गर्व चूर करून टाकेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी, राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे, घड्याळाच्या पाठीशी उभं राहिलात तर बारामती सारखा विकास तुमच्याकडे करील, असे विधान केले होते.

पुणे

Major operation in Khadakwasla-Pavana Dam : खडकवासला–पवना धरण परिसरात मोठी कारवाई, बड्या नेत्याच्या नातेवाईकाचे रिसॉर्ट व फार्महाऊस जमीनदोस्त

जिल्ह्यातील खडकवासला आणि पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर अखेर धडक कारवाई करण्यात आली असून बेकायदा दारूभट्ट्यांसह एका प्रभावशाली नेत्याच्या नातेवाईकाने उभारलेल्या ३२ गुंठ्यांवरील रिसॉर्ट आणि फार्महाऊसचा जमिनीसपाट केला आहे.

पुणे

Sushma Andhare : उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्त्वाकांक्षा मी उघड केल्यामुळे तुमचे मनसुबे उधळले आहेत का? सुषमा अंधारे यांचा पलटवार

“उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्त्वाकांक्षा मी उघड केल्यामुळे तुमचे मनसुबे उधळले आहेत का? तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढे आम्हालाही बोलवा बरं!” असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर केला आहे.

महाराष्ट्र

मतदार यादीतील नावाविषयी 27 नोव्हेंबर पर्यंत करता येणार तक्रार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, संबंधित मतदारांनी आपल्या नावाविषयी काही हरकती किंवा तक्रारी असल्यास त्या 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात

महाराष्ट्र

दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत चर्चा… जयकुमार गोरे यांनी असे केले राजन पाटील यांचे कौतुक

राज्यात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीची बिनविरोध झालेली निवडणूक गाजली.

Pankaja Munde'
मुंबई

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीची आत्महत्या, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर अवघ्या नऊ महिन्यात हा प्रकार घडला.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : बारामती जिल्हा करायचा भानगडीत मी पडत नाही, अजित पवार यांची स्पष्टोक्ती

काही जण म्हणतात बारामती जिल्हा करायचा. मात्र मी जिल्ह्याच्या भानगडीत पडत नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत प्रचारसभेत अजित पवार बोलत होते.

Sharad Pawar
मुंबई

Sharad Pawar : महाविकास आघाडीने एकत्रित लढावे, शरद पवार यांची भूमिका

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढावे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र

काँग्रेस नेतृत्वहीन 2029 पर्यंत राहणार किंचित पार्टी, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

काँग्रेस पक्षात मोठा विसंवाद आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष 2029 पर्यंत किंचित पार्टी राहिल. कारण काँग्रेस पार्टी नेतृत्वहीन झाली आहे.

देश-विदेश

मिशन त्रिशूळची कमाल, बिहारमध्ये एनडीएच्या विजयात आरएसएसची भूमिका ठरली महत्वाची

बिहार विधानसभेच्या 2025 च्या निवडणुकीत एनडीएने मिळवलेला विक्रमी विजय हा जरी भाजप, जेडीयू, एलजेपी (आरव्ही) व इतर सहयोगी पक्षांच्या संयुक्त प्रचारामुळे दिसत असला

महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीची धडक बसून नवरा–बायकोसह दोन लहान मुलांचा अपघात

बीड जिल्ह्यात धूनकवड फाटा परिसरात आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाला.