Uddhav Thackeray : भाजप व संघाकडून मुंबईत भाषिक प्रांतवादाचे विष, उद्धव ठाकरे यांचा आरोप
भाजप व संघ मुंबईत भाषिक प्रांतवादाचे विष पसरवत आहेत. पण त्याचे खापर आपल्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. काल-परवा एक दुर्दैवी घटना घडली. ती घडायला नको होती. भाषेवरून कुणाचे खून करा, कुणाला मारा अशी आपली मागणी नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे











