Nilesh Rane : सिंधुदुर्गात युती तुटण्यामागे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, निलेश राणेंचा आरोप

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : Nilesh Rane सिंधुदुर्गातील युती तुटण्याचे कारण वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व नसून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला.Nilesh Rane

माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले,

“रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, लांजा, चिपळूण येथे जागांचे समायोजन सहज झाले. मग सिंधुदुर्गाबाबतच विरोध का? प्रदेशाध्यक्षांना सिंधुदुर्गाबद्दल काय राग आहे, हे अजूनही कळलेले नाही.”Nilesh Rane

राणेंनी सांगितले की, मालवणमध्ये आम्ही १० जागा द्यायला तयार होतो, तर सावंतवाडीत दीपक केसरकर ५०-५०च्या फॉर्म्युलाला तयार होते. कणकवली कोकणात तुम्हाला फक्त एक-दोन जागा मिळतील, असे यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले. आमचे फोटो बॅनरवरून काढले तरी चालले असते, पण एकनाथ शिंदे यांचे फोटो काढले गेले. हे आम्हाला वेदनादायी होते,Nilesh Rane



“आम्ही आधीच ठरवले होते की राणे कुटुंब जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. पण त्याच राणेंनी आम्हाला सांगितले की, ‘थांबू नका, नाहीतर तुमचे दिवस फुकट जातील’. त्यामुळेच आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे सांगून निलेश राणे भाजप प्रदेशाध्यक्षांवर टीका करताना म्हटले,“इतके मोठे पद असूनही तुम्ही तीन दिवस सिंधुदुर्गात बसून काय करत होतात? त्या बैठकींमध्ये काय ठरले, हे मी योग्य वेळी सांगेन.”

चंद्रशेखर बावनकुळे व चंद्रकांत पाटील यांच्या कामाचे कौतुक करताना निलेश म्हणाले, “त्यांनी आपल्या पदाला किती उंची दिली हे आम्ही पाहिले आहे. फक्त दोन-तीन जिल्ह्यांत राजकारण करणे योग्य नाही, हे सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. महायुती सिंधुदुर्गात का नको होती याचे उत्तर फक्त रविंद्र चव्हाणच देऊ शकतात,

BJP state president Ravindra Chavan and Nilesh Rane allege that the alliance in Sindhudurg is broken.

महत्वाच्या बातम्या