लालू यादव यांनी विकासाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा जंगलराज निवडला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
बिहारच्या जनतेने राजद सरकारला १५ वर्षे संधी दिली. लालू यादव यांना हवे असते तर ते विकासाचा मार्ग पत्करू शकले असते, परंतु त्यांनी जंगलराज निवडला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानात बोलताना केली.











