Anmol Bishnoi, : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येत आहे. अभिनेता सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही अनमोलचे नाव समोर आले.











