Rupali Thombre रुपाली ठाेंबरे आक्रमक, पत्र लिहून पक्षाकडेच मागितला खुलासा
राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटात महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि माजी प्रवक्त्या रुपाली ठाेंबरे यांच्यात वाद सुरू आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटात महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि माजी प्रवक्त्या रुपाली ठाेंबरे यांच्यात वाद सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या काेरेगाव पार्क जमीन प्रकरणात खालच्या अधिकाऱ्यांनी खरी बदमाशी केली. एक तहसीलदार, मुद्रांक अधिकारी व देणारे – घेणारे दोन लोक, या लोकांनी केलेली ही चूक आहे
आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये मतदारांना यंदा अनोखे दृश्य पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिशिष्ट ड मधील यादीत तब्बल १६५ निवडणूक चिन्हे समाविष्ट असून, ही चिन्हे इतिहास, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यांचे अनोखे मिश्रण असल्याने निवडणुकीतील ‘चिन्हयुद्ध’ (Symbol War) रंगतदार ठरणार आहे.
विशेष प्रतिनिधी बीड : धनंजय मुंडेंमुळे वंजारी समाजालाही सूख नाही. एक चांगली जात याच्यामुळे बदनाम होत आहे. आता त्यांना हा
पवार यांच्या अमेडिया कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीला याचा अभ्यास करू द्या, काय अहवाल येतो ते पाहू. पण माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मला योग्य वाटेल ते मी करेन, असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले व्यावसायिक समीर पाटील यांच्याविरुद्ध कोणतेही बदनामीकारक विधान किंवा टिप्पणी करू नका अशा शब्दांत दिवाणी न्यायालयाने माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) यांना सुनावले आहे.
भाजप नेते जगदीश मुळीक यांची नुकतीच अँजिओग्राफी आणि दुसऱ्या दिवशी बायपास सर्जरी करण्यात आली. मुख्यमंत्र्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः डॉक्टरांशी बोलून उपचाराची व्यवस्था केली.
गैरप्रकाराच्या आरोपांनंतर जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करणाऱ्या अमेडिया कंपनीला बुडवलेले मुद्रांक शुल्क आणि यापोटी ४२ कोटी भरण्याचेआदेश मुद्रांक शुल्क विभागाने नोटिशीद्वारे दिले होते. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मुंढवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे, तर ४२ कोटी रुपयांची नोटीस का दिली,’ असा प्रश्न उपस्थित केला. याबाबत आपण नोंदणी महानिरीक्षकांकडून (आयजीआर) माहिती घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळामध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेला पती आणि वडील नाही त्यांना केवायसी करता येत नाहीये.
मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटानंतर देशातील सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांच्या कन्येच्या सातारा येथील विवाहसोहळ्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते.