बच्चू कडू यांची आंदोलने पैशासाठीच, गुवाहाटीलाही पैशासाठीच गेले, रवी राणा यांचा हल्लाबाेल
प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते
प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते
आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी अभिनेते महेश कोठारे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा आराेप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात बोगस मतदार नोंदणीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्य निवडणुका ताेंडावर असताना महायुतीत नाराजी निर्माण हाेऊ नये यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माेठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
राज्यात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.केंद्र सरकारने लावलेल्या निकषांमुळे तसेच शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याची मंजुरी आलेली नाही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.
दादरमधील कबुतरखाना प्रकरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी कबुतरखाना बंद करून त्यावर ताडपत्री टाकत सील केले होते.
‘हिंदी सक्ती’ आणि ‘त्रिभाषा सूत्र’ हे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसले होते. या ऐतिहासिक क्षणानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींना अक्षरशः वेग आला आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवरील भव्य दीपोत्सवावर राजकीय वाऱ्यांची झुळूक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दरवर्षी आयोजित करत असलेल्या या सोहळ्याची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून झालेल्या प्रसिद्धीत मनसेचा उल्लेखच टाळल्याने मनसेने कडक आक्षेप घेतला असून, “सरकारने आमच्या उपक्रमाचे क्रेडिट हायजॅक केले,” असा खोचक टोला लगावला आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याचा प्रकार केरळमध्ये उघड झाला आहे. सोमवारी सकाळी (२२ ऑक्टोबर) राष्ट्रपतींना शबरीमला यात्रेला घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, प्रमादम (केरळ) येथे नव्याने बांधलेल्या हेलिपॅडवरील खड्ड्यात अडकले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर चूक मानली जात आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून हिंदू शौर्य आणि सांस्कृतिक अस्मितेचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह आणि महाराणा प्रताप यांनी राजकीय इस्लामच्या अत्याचारांविरुद्ध शौर्याने लढा दिला होता.”
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, काँग्रेसच्या भूमिकेवरून राजकीय चर्चांना जोर आला आहे.