Mohammad Mustafa, : मुलाच्या मृत्यूप्रकरणी पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा, माजी मंत्री पत्नी आणि मुलीवर खुनाचा गुन्हा
पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी, माजी मंत्री रझिया सुलताना तसेच मुलगी यांच्या विरोधात त्यांच्या मुलगा आकिल अख्तरच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 103(1) (खून) आणि कलम 61 (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पंजाबच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.











