Suraj Chavan : असभ्य वर्तनाला शिक्षा ऐवजी फलदायी ठरत आहे का? सुरज चव्हाण यांची पुन्हा बढती!
मुंबई : Suraj Chavan : सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी करायला गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण यांची सातत्याने बढती होताना दिसत आहे. आता संबंधित धोरण ठरवणाऱ्या समितीत सुरज चव्हाण यांची स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे असभ्य वर्तन केल्यामुळे शिक्षा मिळणे ऐवजी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.











