Sanjay Raut : ‘आमची 15 मतं अवैध ठरवली…..’; राऊतांना हा पराभवही पचवता येईना
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काल (ता.९) मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे विजयी झाले. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना हार पत्करावी लागली. मात्र लोकसभा आणि राज्यसभेप्रमाणे इंडिया आघाडीला हा पराभवही पचवता येत नसल्याचं दिसतंय.











