Ganesh idol : विसर्जनानंतर गणेश मूर्तीचे चित्रण नको ; अन्यथा होईल कारवाई…!
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ४ ते १५ सप्टेंबर या कालावधीत गणेश मूर्ती विसर्जनाच्या दृश्यांचे चित्रीकरण आणि प्रसार करण्यास मनाई केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.











