Chagan Bhujbal : मंत्रिमंडळ बैठकीवर छगन भुजबळ यांचा बहिष्कार, मराठा आरक्षण जीआरवर नाराजी
मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी आता सरकारला इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केली.











