Maratha community : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन, समता परिषदेचा इशारा
मराठा आंदोलन मनोज जरांगे यांचे आंदोलन शेवटच्या टप्प्यात आले असताना ओबीसी संघटनांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा ज्योतीबा फुले समता परिषदेमार्फत देण्यात आला आहे.











