Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Nida Khan
महाराष्ट्र

Nida Khan : टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक

नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (‘TCS) कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली

Avinash Pathak
महाराष्ट्र

Avinash Pathak : बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिसांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. लातूरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिली. या अटकेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भूसंपादन घोटाळ्याला आता नवे वळण मिळाले आहे. अविनाश पाठक यांना अटक केल्यानंतर त्यांना बीड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

Dokadia family
महाराष्ट्र

Dokadia family : कलिंगड खाल्ल्याने नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू

मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूचा छडा 11 दिवसांनंतर लागला आहे. या चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने नाही, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फॉरेन्सिक अहवालात मृत व्यक्तींच्या शरीरात आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडाच्या नमुन्यांमध्येही ‘झिंक फॉस्फाईड’ या घातक रसायनाचे अंश आढळल्याने वैद्यकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

देश-विदेश

विजय यांनी ११८ आमदारांचा पाठिंबा दाखवाला तरच सरकार स्थापन करता येणार, राज्यपालांनी घातली अट

तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापन करायचे असल्यास ११८ आमदारांचा पाठिंबा दाखवावा लागणार आहे. राज्यपालांनी तामिळनाडूमध्ये स्थिर सरकारसाठी ही अट घातली आहे.

मुंबई

फडणवीसांच्या घोषणेची पुण्यात होणार अंमलबजावणी; चार ठिकाणी भुयारी मार्ग…

शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी शहरात ५६ किलोमीटरचे भुयारी मार्ग केले जाणार आहेत.शहरात विविध ठिकाणी ५ बोगदे तयार केले जाणार आहेत.महापालिकेकडून ‘ स्पेशल पर्पज व्हेईकल ‘ कंपनी देखील स्थापन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र

‘शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई होणार’; परभणीत राहुल पाटील आक्रमक

शहरातील ठाकरे सेनेच्या ८० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर,आमदार राहुल पाटील यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्या आणि पदाचे राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग; पहिल्याच दिवशी ४५० एकर जमिनीचा करार..

जिह्यातील पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.पहिल्याच दिवशी तब्बल ४५० एकर जमिनीचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा प्रशासनाकडून ‘ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ‘ या तत्वावर ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे.

महाराष्ट्र

मेट्रो, बस डेपो आणि उड्डाणपूल नियोजनाविरोधात नागरिक आक्रमक; कोथरूडमध्ये सह्यांची मोहीम सुरू

कोथरूड परिसरातील प्रस्तावित मेट्रो स्टेशन, बस डेपो आणि अर्धवट उड्डाणपूल यांच्या चुकीच्या नियोजनाविरोधात स्थानिक नागरिक आणि व्यापारी आक्रमक झाले असून “योग्य नियोजन करा, अन्यथा तीव्र आंदोलन” या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

निदा खानकडेच हाेती कथित मिशन कन्व्हर्जनची जबाबदारी

नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित कथित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्याकडेच कथित मिशन कन्व्हर्जनची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा संशय विशेष तपास पथकाने व्यक्त केला आहे. सध्या निदा खान फरार असून तिचा शोध घेण्यासाठी राज्यभर विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

पुणे

पुण्यात १३ शाळा अनधिकृत; पालकांना प्रवेश न घेण्याचे महापालिकेचे आवाहन

शहरात शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनधिकृत शाळांचा मोठा प्रकार समोर आला असून, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील तब्बल १३ शाळा कोणतीही वैध प्रशासकीय परवानगी न घेता सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र

“शेजारच्या महिलेने अफवा पसरवली”; पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीचा कोर्टात दावा…

जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच,मंगळवारी शहरातील पर्वती येथे पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली.६५ वर्षांच्या आजोबाने आपल्याच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

Suvendu Adhikari
Uncategorized

Suvendu Adhikari : भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढला

श्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा हिंसाचारामुळे ढवळून निघाले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम परिसरात ही धक्कादायक घटना घडली.