CBI busts : आंतरराष्ट्रीय सायबर गुलामी टोळीचा सीबीआयकडून पर्दाफाश, मुंबईसह देशात नऊ ठिकाणी छापेमारी
रतीय तरुणांना परदेशात भरघोस पगार आणि आलिशान जीवनाचे आमिष दाखवून सायबर गुलामगिरीत ओढणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. सीबीआयने मुंबईसह अनेक शहरांमधील नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून या संघटित नेटवर्कवर मोठी कारवाई केली











