पुण्यात भाजपा नगरसेवकांचा वाद विकोपाला; थेट”ॲट्रॉसिटी” गुन्ह्याची नोंद..

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले असून, भारतीय जनता पक्षाच्या दोन महिला नगरसेविकांमधील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचल्याचे दिसून येत आहे. पक्षांतर्गत मतभेद, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि परस्परांवरील गंभीर आरोप यामुळे हा वाद केवळ राजकीय न राहता कायदेशीर चौकटीत पोहोचला असून, या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील आणि नगरसेविका मृणाल कांबळे यांच्यातील मतभेद काही दिवसांपासून वाढत होते. शहरातील काशेवाडी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध धंदे, ड्रग्सचा वाढता व्यापार आणि वेश्याव्यवसायाच्या मुद्द्यावरून दोन्ही गट आमनेसामने आल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर या विषयावर तीव्र भूमिका घेतल्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली.



दरम्यान, जेव्हा नगरसेविका अर्चना पाटील यांनी पोलीस आयुक्तांसमोर मांडलेल्या तक्रारीचा व्हिडिओ कथितरित्या मॉर्फ करून सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला असून, यामागे राजकीय हेतू असल्याचाही आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे नगरसेविका मृणाल कांबळे यांच्या कुटुंबीयांनीही गंभीर आरोप करत कायदेशीर पाऊल उचलले आहे. कांबळे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीय भावना दुखावणे, विशिष्ट समाजाला लक्ष्य करणे आणि कार्यकर्त्यांना धमकावणे असे आरोप या तक्रारीत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

BJP corporators’ dispute escalates in Pune; Direct “atrocity” case registered..

 

महत्वाच्या बातम्या